पुणे: कोरेगाव पार्क, वडगाव शेरीत घरफोडी; दोन लाखांचा ऐवज चोरीला

पुणे, दि. २९ जून २०२१ – शहरातील कोरेगाव पार्क आणि वडगाव शेरी परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाखांचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या असून, संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


कोरेगाव पार्कमधील स्टर्लींग सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेच्या घरातून चोरट्यांनी ९० हजारांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी विजय वासवाणी (वय ५६ ) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून १ लाख १५ हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अमोल शिंदे (वय ४१) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.