पुणे, 03/08/2021: सराईताने अल्पवयीन मुलाला कोयत्याने मारहाण करून त्याच्याकडील दोन हजार लुटून नेल्याची घटना काल रात्री पावणेदहाच्या सुमारास आंबेगाव खुर्दमध्ये घडली आहे. त्यानंतर हातातील कोयता नाचवित परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. प्रवीण आनता येणपुरे (वय २७, रा. वेल्हा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा काल रात्री आंबेगाव खुर्दमधील एका किराणा दुकानासमोर थांबला होता. त्यावेळी तेथे आलेल्या सराईत प्रवीण येणपुरे याने अल्पवयीनाकडे पैसे मागून उलट्या कोयत्याने त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड काढून घेतली. हातातील कोयता नाचवित परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे आजूबाजूचे लोक घाबरून पळून गेले होते. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी दिली आहे.
More Stories
पुणे: लॉकडाउनमुळे कंपनीतील काम गेले, तरूण बनला सराईत चोरटा; तब्बल १७ दुचाकी जप्त
पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात उकळली खंडणी
पुणे: सराईत पप्पु येणपुरे टोळीविरुध्द मोक्का, पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका कायम