पुणे: लोहगाव-वाघोली रस्त्याला तळ्याचे स्वरूप; पाण्याचा निचरा करा अन्यथा स्वातंत्र्य दिनी आंदोलन

पुणे, ११ ऑगस्ट २०२२: लोहगाव-वाघोली मुख्य रस्त्यावर कमरेइतके पाणी साचले असून दुचाकी, कार देखील पाण्यात घातल्यानंतर बंद पडत आहेत. नागरीक अक्षरशः पाण्यात पडत आहेत. सणासुदीचे दिवस असताना मुख्य रस्त्यावरून ये-जा करत करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे नेहमीच्या या समस्येला सर्व नागरिक वैतागले असून जर महापालिकेने लक्ष नाही दिले तर साचलेल्या पाण्यातच 15 ऑगस्ट रोजी झेंडा वंदन करण्याचा इशारा लोहगाव – वाघोली नागरिक विकास मंच ने दिला आहे.

 

पावसाळी लाईन नसल्याने लोहगाव परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचून आहे. पाणी वाहून जाणारे नैसर्गिक स्रोत पुढे बंद केल्याने पाणी साचून रस्त्यावरच पाणी साचून रहात आहे. परिणामी वाहने पाण्यात बंद पडत असून वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेचा पथ विभाग आणि मलनिसराण विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने पाणी आठवडा भर झाले साचून आहे. कमरे इतके पाणी सुमारे 500 मीटर अंतरा पर्यंत आहे. महापालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. आमदार सुनील टिंगरे यांच्या हि समस्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी याबाबत तातडीने महापालिका आयुकतांशी बोलून पाण्याचा तातडीने निचरा करण्याची सुचना दिली.

 

पाणी साचून आहे तर ड्रेनेज लाईन मधून जाणारे पाणी निचरा होत होते मात्र त्यामध्ये गाळ साचल्यामुळे पाणी साचून आहे. पाणी जाण्यास मार्ग नसल्याने कमरे इतके पाणी साचून आहे. वाहने बंद पडत आहे, ऍम्ब्युलन्स गाडी पाण्यात अडकत आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होत असून स्कुल बस उशिरा शाळेत पोहचत आहेत. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर मलनिसारण विभाग म्हणते पाण्याचा निचरा करण्याचे आमचे काम नाही. पथ विभागाला संपर्क केला असता पथ विभाग म्हणते मलनिसारण विभाग वाहतूक कोंडी होत असून ऍम्ब्युलन्स पाण्यात अडकत आहे. टेम्पो, दुचाकी घसरून अपघात होत आहेत. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार वाढले आहेत.

 

महापालिकेने जर या गंभीर समस्या कडे लक्ष दिले नाही तर देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन यात साचलेल्या पाण्यात साजरा करून महापालिकेचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याचा इशारा लोहगाव-वाघोली रोड विकास मंच ने महापालिकेला दिला आहे.