पुणे, ०८/०८/२०२५: परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक पंकज देवरे साहेब यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन सणानिमित्त अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, दि. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी महिला प्रवाशांसाठी ‘लकी-ड्रॉ’ योजनेचे आयोजन करण्यात आले आहे.
पीएमपीएमएल पुणे, पिंपरी-चिंचवड, उपनगरे आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात दररोज सुमारे ११ ते १२ लाख प्रवाशांची वाहतूक करते. यामध्ये ४ ते ४.५ लाख महिला प्रवासी दररोज बससेवेचा लाभ घेतात. महिलांसाठी सुरक्षित, सुलभ व किफायतशीर सेवा देण्याचा पीएमपीएमएलचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
लकी-ड्रॉ योजनेची वैशिष्ट्ये
• दि. ०९/०८/२०२५ रोजी वाहकाकडून घेतलेले प्रिंटेड तिकीट/दैनंदिन पास, युपीआय द्वारे किंवा मोबाईल अॅपवरून काढलेले तिकीट/ दैनंदिन पास असलेल्या महिला प्रवाशांनाच सहभाग घेता येईल.
• योजनेतून एकूण १७ महिला विजेत्यांची निवड संगणकीकृत सोडत पद्धतीने केली जाणार आहे.
• विजेत्यांना ‘कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज’ तर्फे पैठणी व पीएमपीएमएल कडून एक महिन्याचा मोफत बस पास प्रदान करण्यात येईल.
• या उपक्रमासाठी रेडिओ मिर्ची ९८.३ हे रेडिओ पार्टनर असून, त्यांच्यातर्फे या योजनेचे व्यापक प्रमोशन करण्यात येत आहे.
सहभागाची प्रक्रिया
बसमध्ये लावण्यात आलेला क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाइन फॉर्म भरता येईल.
स्मार्टफोन नसलेल्या महिला प्रवाशांनी वाहकाकडून कूपन घ्यावे व आवश्यक माहिती भरून बसमधील बॉक्समध्ये टाकावे.
एका तिकीटासाठी एका मोबाईल नंबर वरून एकदाच सहभाग घेता येईल.
ऑनलाइन/ऑफलाइन फॉर्मवर तिकीट क्रमांक व आधार कार्डवरील शेवटचे चार अंक नमूद करणे आवश्यक आहे.
चुकीची/अपूर्ण माहिती दिल्यास किंवा तिकीट/ दैनंदिन पास सादर न केल्यास बक्षीस देण्यात येणार नाही.
नियम व अटी
पीएमपीएमएलचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.
लकी-ड्रॉ रद्द/स्थगित करण्याचे व अटींमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार पीएमपीएमएलकडे राहतील.
विजेत्यांची नावे व सोडतीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
या रक्षाबंधन सणाला एक वेगळीच आनंदाची जोड देण्यासाठी, महिला प्रवाशांनी या लकी-ड्रॉमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमपीएमएल तर्फे करण्यात येत आहे.
More Stories
पुण्यात प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात जोरदार मोर्चा
“जैन धर्माच्या पवित्र जागेचा सौदा – ट्रस्टकडून बिल्डरच्या घशात जमीन घालण्याचा डाव!”
Pune: उंड्रीमध्ये एका सदनिकेत आगीची घटना; एक मृत तर पाच जखमी