September 10, 2025

Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर

पुणे, ८ सप्टेंबर २०२५ : टूर दी फ्रान्सच्या धर्तीवर होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीला पुणे शहर सज्ज झाले आहे. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत ६८४ किलोमीटर लांबीचा मार्ग असून, त्यापैकी तब्बल ७५ किलोमीटरचा टप्पा पुण्यातून जाणार आहे.

या मार्गावरील रस्त्यांची डांबरीकरण, चेंबर व पादचारी मार्ग दुरुस्ती, अतिक्रमण निर्मूलन आदी कामांसाठी १४५ कोटी ७५ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले असून, त्याला महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीची मान्यता मिळाली आहे.

पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, “जागतिक दर्जाच्या या स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उंचावला जाणार आहे. दोन ते तीन महिन्यांत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.”

चार पॅकेजमध्ये काम

पॅकेज १ : ९.४७ किमी रस्ता – ३०.८० कोटी

पॅकेज २ : २८.५३ किमी रस्ता – ३२.६७ कोटी

पॅकेज ३ : १४.३२ किमी रस्ता – ३८.२२ कोटी

पॅकेज ४ : २२.४७ किमी रस्ता – ४४.०५ कोटी

असा असेल सायकल मार्ग

बालेवाडी–सूस–पाषाण–पुणे विद्यापीठ–राजभवन मार्ग–एसबी रोड–डेक्कन–शिवाजीनगर–जंगली महाराज रस्ता (२८ किमी)

कर्वे रस्ता–नळस्टॉप–वनाज कॉर्नर–म्हात्रे पूल (८.५ किमी)

शास्त्री रस्ता–टिळक रस्ता–शनिवारवाडा–सारसबाग–नेहरू रस्ता–लाल महल (२.३ किमी)

कॅन्टोन्मेंट–रेसकोर्स–आंबेडकर चौक–जिल्हा परिषद (८.२ किमी)

ईस्ट स्ट्रीट–लुल्ला नगर–कोंढवा–बोपदेव घाट (१२.८ किमी)

खडकवासला–कोळेवाडी–नांदेड सिटी (५ किमी)