पुणे : महिलेसोबत अत्याचार करून मागितली १ कोटींची खंडणी

पुणे, दि. १५ जुलै २०२१: – फेसबुक फ्रेंड झाल्यानंतर तरूणाने विवाहित महिलेसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत अत्याचार केले. त्यानंतर महिलेचे अश्लिल व्हिडिओ रेकॉडिंग करून तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार वानवडीत घडला आहे. सौरभ सुभाषचंद्र सुखिजा ( वय ३१,रा. पटियाला, पंजाब) याच्याविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने तक्रार केली आहे.


सौरभने फिर्यादी महिलेसोबत फेसबुक मेसेंजरव्दारे संपर्क साधला होता. त्यांची ओळख वाढल्यानंतर तो पंजाबमधील पटीयालावरुन पुण्यात महिलेला भेटायला आला होता. त्यानंतर त्याने तिच्या घरामध्ये येऊन सरबतातून गुंगीचे औषध टाकून अत्याचार केला. त्याचे फोटो, व्हिडिओ शुटींग करुन ठेवले. त्याने महिलेचे मंगळसूत्रही काढून घेतले होते. फोटो व शुटींग त्याने स्वत:च्या स्टेटसला ठेवले होते. मंगळसूत्र, फोटो व अश्लिल व्हिडिओ शुटींग परत देण्याच्या बदल्यात त्याने महिलेला १ कोटीच्या रकमेची मागणी केली होती. यासाठी तो पीडितेला वारंवार फोन, मेसेज व व्हिडिओ कॉल करुन धमकी देत होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड तपास करत आहेत.