पुणे पोलीस आयुक्तलयात पेटवून घेतलेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे, १९/०८/२०२१: चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या एकाने स्वत:ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी पोलीस आयुक्तालयात घडली होती. संबंधीत तरुणाचा खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईकांनी पोलिस यंत्रणेवर आरोप केला आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (वय ४२,रा.खडकी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पिंगळे पोलीस आयुक्तलय कार्यालयात आले होते. त्याठिकाणी त्यांना कागदपत्रांची छाननी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून चारित्र्य पडताळणी होत नसल्यामुळे सुरेश यांनी रॉकेल अंगावर ओतून घेत पेटवून घेतले. पेट घेतलेल्या अवस्थेतच ते पोलीस आयुक्तलयाचे कार्यालयात पळत गुन्हे शाखेच्या इमारतीकडे गेले. गेटवरील बंदोबस्तावरील कर्मचारी व गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी त्याच्या मागे धावत गेले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. भाजलेल्या अवस्थेत पिंगळे यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यानंतर त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. पेटवून घेतल्यामुळे सुरेश ९० टक्के भाजले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते. दरम्यान, घडलेली घटना खूपच दुर्दैवी असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे.

पोलिसांना त्याच्या बॅगेत काही कागदपत्रे सापडली होती. त्यामध्ये एक सुसाईड नोटसही होती. यामध्ये त्याने पोलीस यंत्रणेच्या त्रासाबरोबरच घरगुती आणी काही मित्रांकडून होणाNया त्रासाबद्दल लिहले आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीने बंडगार्डन पोलिसांना एक अर्ज दिला आहे. त्यामध्ये पोलिसांनी सुरेश व्यवस्थित शुध्दीवर असताना जबाबाची नोंद केली नाही. तसेच मागील दोन महिण्यात चारित्र्य पडताळणीसाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळ्याने त्यांनी पाऊल उचलले असल्याचा आरोप केला आहे.