पुणे: लोहगावमध्ये पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे, दि. १५/१२/२०२२- कामावरून सुटल्यानंतर रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४३ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १३ डिसेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास लोहगावमधील पठारे वस्तीवर घडली. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला १३ डिसेंबरला कामावरून सुटल्यानंतर घरी चालली होती. त्यावेळी पठारे वस्ती परिसरात दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून गळ्यातील ४३ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंट चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रत्ना सपकाळे तपास करीत आहेत.