पुणे, १७/११/२०२१: मॅरेथॉन शर्यतीत आपला वेगळा ठसा उमटविणारे, प्रदिर्घ काळ सायकलिंग करणारे बास्केटबॉलपटू, प्रवासी उद्योजक एक बहुआयामी उत्कट क्रीडापटू ज्याने वेडा विचार करा, कच्चे रहा हे आपल्या जीवनाचे ब्रीदवाक्य केले असा अस्सल पुणेकर आशिष कासोदेकर अल्ट्रा डायनामो या सर्वाधिक दिवस मॅरेथॉन धावण्याचा जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. या विक्रमाची दखल गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेणार असून, त्यासाठी तो ६० दिवसांत ६० पूर्ण मॅरेथॉन धावणार आहे. येत्या २८ नोव्हेंबरपासून तो या उपक्रमाला सुरवात करेल. त्यानंतर २६ जानेवारी २०२२ रोजी तो अखेरची मॅरेथॉन धावेल.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी कासोदेकर प्रयत्न करणार असल्याची घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी केली. ट्रॅव्हल टाईमचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह संस्थापक विवेक काळकर, अल्ट्रा डायनामोचे संस्थापक आणि स्पर्धा संचालक अरविंद बिजवे, धावपटू आशिष कासोदेकर, कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, मृणाल काळकर या वेळी उपस्थित होते.
स्पर्धा संचालक अरविंद बिजवे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून आम्ही मेकिंग इंडिया रन मोहिम करत आहोत. पण, कोविडच्या कालावधाती १८ महिन्यात मॅरेथॉन आणि मोठे सोहळे असे झालेच नाहीत. त्यामुळे आमच्या डोक्यात ६० दिवस सलग ६० मॅरेथॉन करण्याची कल्पना आली. या शर्यतीत सहभागी होण्यासाठी धावपटूंनी कोणाताही एक दिवस निवडायचा आहे. मॅरेथॉन शर्यत धावपटूंना स्वतःची तंदुरुस्त राखण्यास मदत करते.
श्री. बिजवे पुढे म्हणाले की, शर्यतीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ५ कि.मी.चा ट्रॅक निश्चित करण्यात आला आहे. या ६० दिवसांच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या सर्व धावपटूंना वेळचे प्रशस्तीपत्रक, शर्यत पूर्ण केल्याचे पदक मिळणार आहे. शर्यती दरम्यान आवश्यक टायमिंग चिप आणि ऑन रुट सहाय्य मिळणार आहे. हा मार्ग एम्सने जागतिक अॅथलेटिक्सच्या माध्यमातून प्रमाणित करून घेतला आहे. धावण्यासाठी तारखेचे बंधन नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी येऊन धावू शकता. यामध्ये एखाद्या धावपटूने ६० दिवसांत आठ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस धावल्यास त्याला अल्ट्रा डायनामो शिर्षक असलेले स्मृतिचिन्ह मिळेल.
ट्रॅव्हल टाइमचे श्री विवेक केळकर म्हणाले, हे वर्ष स्वांतत्र्याची ७५ वर्षे म्हणून साजरे केले जाणार आहे. फिट इंडिया मु्व्हमेंच्या माध्यमातून आशिष सलग ६० दिवस पूर्ण मॅरेथॉन धावण्यासाठी सज्ज झाला आहे. हा जागतिक विक्रम ठरणार असून, गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या विक्रमाची दखल घेणार आहे. तंदुरुस्ती हे माझ्या आयुष्याचे ब्रीदवाक्य आहे. माझ्याबरोबर असलेल्या प्रत्येकाच्या सहकार्याने तंदुरुस्तीचा प्रचार करणे हे माझ्या आयुष्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधी ही एक छोटी कल्पना होती. पुढे त्याला मोठ्या कार्यक्रमाचे स्वरुप आले. शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या या खडतर प्रयत्नांसाठी आम्ही आशिषबरोबर जोडलो गेल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या खडतर आव्हानासाठी त्याला आमच्या शुभेच्छा !
हा उपक्रम एक तंदुरुस्ती सोहळा म्हणून साजरा करण्याचा आमचा मानस आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी या विक्रमात सहभागी व्हावे ही अपेक्षा व्यक्त करतो. चला तर मग, आशिषला त्याचा विश्वविक्रम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येऊ. त्याच्या उपक्रमाचा सर्वांना अभिमान वाटावा आणि प्रत्येकाला तंदुरुस्तीचे महत्व पटवण्यासाठी प्रोत्साहित करेल यात शंका नाही.
More Stories
बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद