पुणे: कोथरूडमधील सराईत आखाडे टोळीवर मोक्का

पुणे, दि. २५/०७/२०२२: कोथरूड परिसरात संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार रोहीत विठ्ठल आखाडे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. संबंधित टोळीने तरूणाला पिस्तूलाचा धाक दाखवून ५० हजारांची खंडणी उकळली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार केलेली ही ९२ वी कारवाई आहे.

रोहीत विठ्ठल आखाडे (टोळीप्रमुख, वय २६ रा. शास्त्रीनगर,कोथरुड ) आकाश सुरेश कंधारे (वय २३ रा. चिंचवडे, बेलावडे, ता-मुळशी) संकेत कैलास धार्इंजे (वय २६ रा. गोखलेनगर) राजू कुNहाडे अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

सराईत आखाडे टोळीने खुनाचा प्रयत्न करणे, जबरदस्तीने खंडणी मागणे, दहशत माजवणे, शस्त्र बाळगणे, मारामारी करण्यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याशिवाय आखाडे याने तरूणाच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देत ६० लाखांची खंडणी मागितली होती. त्यातील ५० हजार रूपये स्वीकारल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव युनीट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यावतीने अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांना सादर केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्ता श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, उपनिरीक्षक शंकर पाटील, मच्छिंद्र वाळके, पुजारी, खेडकर, मेमाणे, सकटे, कारखेले,लाहिगुडे, ताकवणे, व्यवहारे, पवार, काटे, टिळेकर, धाडगे, तांबेकर काळे यांनी केली