पुणे: बावधनमध्ये ‘दिवाळी पहाट’ ची सुरेल मैफिल

पुणे, 23 ऑक्टोबर 2022: बावधन सिटीझन्स फोरमच्या वतीने “आर्ट अड्डा – हॅपी बावधन” या उपक्रमाअंतर्गत चेलाराम हॉस्पिटल प्रायोजित ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम पद्मश्री ग दि माडगूळकर उद्यान येथे शनिवारी (ऑक्टोबर २२) रोजी पहाटे आयोजन करण्यात आले होते.

सुप्रसिध्द कलाकार भाग्यश्री कुलकर्णी, अनुराधा लेले, वृंदा काळे, क्षितिज कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी यांनी रसिकप्रेक्षकांसाठी काही उत्तमोत्तम रचना सादर केल्या. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ख्यातनाम लेखक, अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम गोखले, पं हेमंत पेंडसे आणि उदय रामदास उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमासाठी श्री क्लासेस, दास रिऍलिटी, पंडित जसराज स्कूल ऑफ म्युझिक फाऊंडेशन व ताम्हणकर डेंटल यांचे सहकार्य होते.