मेट्रोने जीवनमान उंचावेल, गती वाढली

फातिमा इनामदार

पुणे, ०९/०३/२०२२: मेट्रोचा प्रवास सुखद आणि सर्वांसाठी सुरक्षित बनला आहे. कोणत्याही प्रकारचे अडथळे न येता जलद गतीने होणारा हा प्रवास आहे. मेट्रो मध्ये सर्व वायोगटात मधील नागरिकांच्या सुख-सुविधांना पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे. मेट्रोने नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि शहराला गती मिळेल

 

६ मार्च, २०२२ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यामध्ये उद्घाटन झालेल्या वनाज ते गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन या प्रवासाचा आज अनुभव घेतला.

सुरुवातीला गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकावर कोरोनाची चाचणी करण्यात आली. तदनंतर पुढे तिकीट काढण्यासाठी युनिव्हर्सल पास वा डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र पाहण्यात आले. तिकीट घेतल्यानंतर प्रवेश करण्यापूर्वी सर्वांची तपासणी करण्यात आली. डेटा तिकीटाचा वापर करून गेट उघडण्यात येते. पुढे स्थानकावर एका रांगेत उभे राहण्यासाठी केलेल्या चिन्हांवर उभे रहावे लागते. गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन हे पूर्णत: हा तरुण आणि नवनिर्मितीचा घटकांनी प्रेरित असलेले जागतिक दर्जाचे डिझाईन आहे. तेथील सजावट पाहून मन शांत झाले.

 

युवा मुला- मुलींच्या मते त्यांना प्रवासामध्ये सहजता आली, वेळेची बचत झाली, त्याच बरोबर इतर नागरिक प्रवास यांच्यामध्ये सुखद आणि सुरळीत प्रवास झाला आहे. सर्वजण खुप आनंदाने हा प्रवास करत आहेत. मेट्रो मधील विविध सुविधांचा लाभ घेत आहेत. इतर ठिकाणांवर हा प्रवास लवकरात लवकर सुरू व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.