पुणे, 09 जुलै 2021: रस्त्यातील गर्दी कमी होण्यासाठी शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली रहावीत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक विधानभवनात आज झाली. यावेळी आ. शिरोळे बोलत होते..नागरिकांनी कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करावी. नियम मोडणाऱ्यांवर प्रशासनाने, पोलीसांनी कडक कारवाई करावी. दिल्लीमध्ये याच पद्धतीने कोविड साथ नियंत्रणात आणण्यात आली, असे आ. शिरोळे यांनी सांगितले.
जे नागरिक दोनदा कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत आणि दोनदा कोविड .पॉझिटीव्ह होऊन मृत्यूमुखी पडले अशा नागरिकांची वेगळी यादी शासनाने करावी, कोविड प्रतिबंधक लसीचे २ डोस पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांना प्रवासासाठी आरटीपीसीआर टेस्टचे बंधन नसावे, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी केल्या.
More Stories
ठाण्याला हरवून पुणे उपांत्य फेरीत
अस्मयच्या हॅटट्रिकने लौकिक एफएचा विजय पीडीएफए फुटबॉल
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सार्थ बनसोडेचा मानांकित खेळाडूवर विजय