पुणे: अट्टल चोरट्याकडून ८७ हजाराचे मोबाइल जप्त

पुणे, २८ जुलै २०२२: मोबाईल चोरीमध्ये माही असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली त्याच्याकडून 87 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले तसेच पूर्वीचे दोन गुन्हे हे उघडकीस आणले.

युनिट दोनचे उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे व कर्मचारी हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना मोहसीन शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत एक इसम संजय गांधी मार्ग, पुणे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरीतील मोबाइल स्वस्तात विक्री करीत थांबला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांना माहिती देताच, तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. युनीट दोनशे सापळा रचून अनिल अरुण बोबडे (वय 29 रा. सिनेगॉग स्ट्रीट, इमाम वाडा,कॅम्प) येथून त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेऊन त्याच्याकडील विविध ब्रॅंडचे एकूण 87000/- ₹ किमतीचे 09 महागडे मोबाइल हस्तगत केले. हे मोबाइल त्याने पुणे स्टेशन व पुणे परिसरातून चोरी केल्याची चौकशीत कबुली दिली. तसेच बंडगार्डन व फरासखाना पोलिस ठाण्यातील मोबाईल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले.
तसेच इतर 7 मोबाईल बाबत तांत्रिक विश्लेषणा आधारे त्यांचे मूळ मालकांचा शोध घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याची प्रयत्न सुरू आहे. अनिल बोबडे हा रेकॉर्डवरील अट्टल मोबाइल चोर गुन्हेगार असून यापूर्वी बंडगार्डन पोलिसानी त्याचे कबज्यातून चोरीचे 75 मोबाइल हस्तगत करून कारवाई केली होती परंतु जामिनावर सुटून त्याने पुन्हा गुन्हे केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले मॅडम, API विशाल मोहिते, PSI राजेंद्र पाटोळे, PSI नितीन कांबळे पो.अ. शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, समीर पटेल, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, विजय पवार, विनोद चव्हाण, संजय जाधव, उज्वल मोकाशी, उत्तम तारू, मोहसीन शेख, गणेश थोरात, गजानन सोनुने, कादिर शेख व नागनाथ राख या पथकाने केलेली आहे