पुणे, ८ जून २०२१: -शहरातील बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत दर्शन युवराज हळंदे टोळीविरूद्ध पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार या टोळीवर मोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यानुसार करण्यात आलेली ही २७ वी कारवाई आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत दर्शन युवराज हळंदे (वय २१, रा. अपर बिबवेवाडी ) आणि रोहन उर्फ मोन्या बाळू सातपुते (वय १८, रा. कात्रज – कोंढवा रस्ता) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
गुन्हेगारी करण्याच्या उद्देशाने सराईत हळंदे याने टोळी तयार केली होती. त्यानुसार बिबवेवाडी परिसरात दहशत पसरवित दंगा, मारामारी, खूनाचा प्रयत्न या टोळीकडून करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. हळंदे टोळीने १५ मे ला आकाश बाजीराव खोपडे याच्यावर तलवार उगारली होती. त्याशिवाय मॉन्टी कालेकर या तरूणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. हळंदे टोळी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत गुन्हे करीत होती. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध मोकानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पाठविला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त गुप्ता यांनी कारवाईची परवानगी दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, एपीआय किरण पावसे, पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे, चंद्रकांत माने, स्मित चव्हाण, दैवत शेडगे यांच्या पथकाने केली.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार