कोंढवे धावडेत टोळक्याकडून मायलेकाला मारहाण

पुणे, दि. १५ (प्रतिनिधी) – दुचाकीला कट मारल्याप्रकरणी विचारणा केल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तरूणाचा पाठलाग करून त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून मायलेकाला मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास कोंढवे धावडेतील गजानन इमारतीत घडली. याप्रकरणी धीरज गणेश धावडे, भूषण तानाजी धावडे, कुणाल किरण धावडे, संकेत तानाजी धावडे, चिराग भगवान धावडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वैशाली धावडे (वय ५५) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी वैशाली यांचा मुलगा अभिजीत दुचाकीवर घरी चालला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला दुचाकीवर कट मारला, त्यामुळे अभिजीतने त्यांना विचारणा केल्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर टोळक्याने अभिजीत यांचा पाठलाग करून त्याच्या घरी गेले. टोळक्याने त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून नुकसान केले. त्याशिवाय वैशाली आणि अभिजीतला मारहाण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. वाघमारे तपास करीत आहेत.