पुणे, दि. २८ जुलै २०२१: हवेली तालुक्यातील सात गावांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी मुळा-मुठाच्या फुगलेल्या नदीपात्रातील सुमारे ४५० मीटर लांबीच्या ओव्हरहेड वीजवाहिनीची दुरुस्ती करीत पर्यायी व्यवस्थेतून सुरु असलेल्या सात गावांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. २७) पूर्ववत केला.
याबाबत माहिती अशी की, शिंदेवाडी व हिंगणगाव (ता. हवेली) गावामधील मुळा-मुठा नदीच्या पात्रात सुमारे ४५० मीटर लांबीची एक उच्चदाब वीजवाहिनी दि. 24 जुलैला मुसळधार पावसामुळे तुटून नदीमध्ये पडली होती. त्यामुळे कोरेगाव मूळ, भवरापूर, आष्टापूर, टिळेकरवाडी, खामगाव टेक, हिंगणगाव व शिंदेवाडी या गावांतील सुमारे २२५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यातील पाच गावांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुवरठा सुरु करण्यात आला. मात्र हिंगणगाव व शिंदेवाडीमधील सुमारे ६०० ग्राहकांना सिंगल फेजचाच वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकला.
गेल्या तीन-चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस तसेच धरणातून पाणी सोडल्यामुळे मुळा-मुठाच्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगाने सुरु
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार