पुणे: आयटी कंपनीत काम करून मध्यरात्री घरी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणास मुंढवा पोलिसांनी केले अटक

पुणे, १२ जून २०२१: आयटी कंपनीत काम करून मध्यरात्री घरी जाणाऱ्या महिलेचा येथे विनयभंग करणाऱ्या तरुणास मुंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना २९एप्रिल रोजी पहाटे ३:४० वाजता घडली होती. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्हा घडल्यानंतर केशवनगर, मुंडवा , खराडी ,चंदन नगर, साईनाथ नगर, येरवडा या भागातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे पोलिसांनी सातत्याने बारकाईने पाहणी केली. सदर तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तसेच सी.डी.आर. चे तांत्रिक विश्लेषण माहितीच्या आधारे हा गुन्हा यश दीपक डाडर (वय 26 वर्ष, रा. गलांडे नगर वडगाव शेरी , पुणे) याने केला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ११ जून रोजी त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली. याचौकशीत त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानेतो राहत असलेला वडगावशेरी परिसरात रस्त्यावर चावीसह पार्क केलेली होंडा कंपनीची अवेटर मोपेड गाडी वापरून फिर्यादी महिलेचा साईनाथ नगर चौक ते केशवनगर गोदरेज सोसायटी परिसरापर्यंत पाठलाग करून गोदरेज सोसायटी जवळ महिलेचा विनयभंग करून पुन्हा मोटरसायकल आहे त्या ठिकाणी पार्क केली होती. यश याच्यावर मुंढवा आणि येरवडा अशा दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, परिमंडळ 5 च्या पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील , साहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, कल्याणराव विधाते, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले , पोलीस निरीक्षक गुन्हे विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलीस पथक सहायक फौजदारअविनाश मराठे , दिनेश राणे , महेश पाठक , दत्ता विभुते ,नाना भांदुर्गे ,भारत उकिरडे , निलेश पालवे , स्वप्नाली आमले यांनी केली आहे.