पुणे, ०९/०८/२०२२: येरवड्यातील पर्णकुटी पायथा परिसरात आढळून आलेल्या महिलेच्या खूनाचा छडा लावण्यात पोलीसांनी यश आले आहे. कचरा वेचकाने तिचा खून केला असून, महिलेला जबरदस्तीने निर्जनस्थळी नेत लैंगिक अत्याचार केले व त्यानंतर तिचा डोक्यात कठीण वस्तूने मारहाणकरून खून केला, अशी माहिती येरवडा पोलीसांनी दिली आहे.
सतिष संतोष हारवडे (वय ४५, रा. येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याघटनेत गीता राजेशकुमार कुंभार (वय ४६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी यरेवडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे.
आठ दिवसांपुर्वी (दि. १ ऑगस्ट) पर्णकुटी पायथा भागातील झाडीत एका महिलेचा सडलेल्या आवस्थेत मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनातून तिचा डोक्यात मारहाणकरून केल्याचे समोर आले होते. तर, मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने लैंगिक अत्याचार झाल्याचे समजू शकले नव्हते. परंतु, महिलेचे कपडे अस्थाव्यस्थ झालेले होते. तर तिला ओढत नेल्याचा संशय होता. घटनास्तळी एक टोपी व चप्पल सापडली होती. सर्व शक्यता गृहीत धरून परिमंडळ पाचचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक अंकुश डोंबळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, कैलास डुकरे, गणपत थिकोळे, सुरज ओंबासे यांनी तपास सुरू केला. या परिसरातले खासगी व शासकीय सीसीटीव्ही पडताळले. तब्बल १९ ते २० तासांचे फुटेज तपासले. तरीही पोलीसांना क्लु सापडत नव्हता. परंतु, परत-परत सीसीटीव्ही तपासल्यानंतर एकाठिकाणी टोपी घातलेली व्यक्ती कैद झालेले दिसून आले. तपासात तो कचरा (बॉटल) गोळा करणारा निघाला. त्यानूसार या परिसरातील भंगार व्यावसायिकांकडे चौकशी केली. पोलीसांना टोपी व चप्पलबाबत माहिती देऊन त्या वर्णणाच्या व्यक्ती विचारपूस केली. व्यावसायिकाने त्याबाबत माहिती दिली. तो चार दिवस आलाच नव्हता. आजच बॉटल विकून गेला असल्याचे सांगितले. त्याचा शोध घेत असताना तो चिमा घाट येथील बाकड्यावर झोपलेला असल्याचे दिसून आले. त्यानूसार, त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने खूनाची कबूली दिली. लैंगिक अत्याचारकरून खून केल्याचे त्याने सांगितेल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा