पुणे, दि ४/०९/२०२३: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणमध्ये वरिष्ठ टेक्निशियन असलेल्या अधिकार्याचा डोक्यात वार करुन त्याचा खून केल्याची घटना सिंहगड रोड परिसरातील रायकर मळा येथे घडली आहे. गोपाळ कैलास मंडवे (वय-३२)असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाळ मंडवे हे विद्युत वितरण विभागात टेव्निâशियन म्हणून कार्यरत होते. सोमवारी दि. ४ दुपारी ते रायकर मळा परिसरातील खंडोबा मंदिर रोड परिसरातून जात होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर, छातीवर, मनगटावर शस्त्राने वार करुन खून केला आहे. सिंहगड रोड पोलीसांना माहिती मिळताच, ते घटनास्थळी दाखल झाले. मंडवे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला. मंडवे यांचा खून कोणी केला याचा उलगडा झाला नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार