बिबवेवाडीत, दि. ६/०९/२०२३: हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेताना धक्का लागल्याने १६ वर्षाच्या मुलाने साथीदाराच्या मदतीने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले आहे. भांडणात मध्यस्थी करणार्यावरही वार करण्यात आला. ही घटना ४ सप्टेंबरला रात्री पावणेअकरा वाजता बिबवेवाडीतील पासलकर चौकामील संगम हॉटेलसमोर घडली.
अझर आमीर हंमजा शेख (वय ३०, रा. अप्पर बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार कोंढव्यातील १६ वर्षाचा मुलगा व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार