२७ जून २०२५: राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी जिल्हा/राज्य पातळीवर “जनसुनावणी किंवा महिला जनसुनावणी” आयोजित केली जात आहे. ही महिला जनसुनावणी पुण्यामध्ये २ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, पाचवा मजला, पुणे येथे होणार आहे. ही जनसुनावणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी कळविले आहे.
या जनसुनावणी दरम्यान पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचिवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्याशी संबंधित २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षातील सुमारे ३५ प्रलंबित तक्रारींची वॉक-इन तक्रारदारांसह सुनावणी घेतली जाईल. राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक दुपारी १२:०० वाजता संबंधित ठिकाणी प्राथमिक सुनावणी सुरू करेल आणि आयोगाच्या अध्यक्षा दुपारी २:०० वाजता सुनावणी घेतील.
या जनसुनावणीसाठी तक्रारदार महिला थेट सुनावणीस उपस्थित राहून त्यांची तक्रार लेखी स्वरुपात मांडू शकतील.
पिडीत महिला वा तक्रारदार महिलांनी जनसुनावणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
More Stories
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान
Pune: जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध
Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ