पुणे, ७ जून २०२१: भारत सरकारने आयएसआय मार्क नसलेल्या हेल्मेटवर देशव्यापी बंदी जाहीर केली आहे. या बंदीची १ जून २०२१ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.
हेल्मेट सक्ती केल्यापासून देशात दुय्यम दर्जाचे बनावटी हेल्मेटस वापरले जातआहेत. बनावट आयएसआय मार्क असलेल्या हेल्मेट विक्रीवर आळा घालण्यासाठी व नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी देशात नियम कडक करण्यात आले आहेत.
सर्वसाधारणपणे बीआयएस नसलेले हेल्मेट वापरणाऱ्या व्यक्तीला केवळ दंड ठोठावणेच नव्हे, तर नवीन नियमात अशा प्रकारच्या हेल्मेटची विक्रेते व उत्पादक या दोघांनाही शिक्षा दिली जाईल. या शिक्षेमध्ये १ वर्षापर्यंत कारावास किंवा ५ लाख. रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.
या नियमाच्या अंमलबजावणीसाठी काही राज्ये नियमितपणे तपासणी करतात, तर काही राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यात संपूर्णपणे या प्रकारच्या नियमांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी धडपड केली आहे. या प्रकारच्या नियमांमुळे देशात सुरक्षित हेल्मेटच्या विक्री आणि वापरास चालना मिळेल,असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.
More Stories
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यास राज्य सरकारची मान्यता
पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन