पुणे, २६/०८/२०२१: शहरातील ‘अॅमेनिटी स्पेस’च्या जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला सर्शत पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भुमिकेवरुन राष्ट्रवादीच्या बैठकीत जोरदार वादावादी झाली. त्यात राष्ट्रवादीच्या आजी आणि माजी पदाधिकारयांनी या भुमिकेला जोरदार विरोध केला. हा प्रस्ताव कसा फसवा आहे यावर बैठकीत चर्चा झाली. त्यावर अॅमिनेटी स्पेसच्या जागा भाडयाने देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्याचे या बैठकीत एकमताने ठरले.
शहरातील २७० मोक्याच्या अॅमेनिटी स्पेसच्या जागा आहेत. यांमध्ये ८५ जागा या विविध आरक्षणे असणाऱ्या असून, १८५ जागांवर कोणतेच आरक्षण नाही. या जागा ३० वर्षांसाठी भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रस्तावाला विरोध केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
त्यात प्रमुख पदाधिकारयांनी चर्चा करून भूमिका ठरवावी, अशी सूचना केली होती. त्यानंतर शहरातील ‘अॅमेनिटी स्पेस’च्या जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस सशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेउन जाहीर केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अचानक भूमिका बदलल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही खदखद निर्माण झाली.हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांच्यापर्यंत गेला. त्यांनी ‘तुम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन भूमिका निश्चित करा,’ असे सांगितले. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आजी आणि माजी पदाधिकारयांची पालिकेत बैठक झाली.
या बैठकीला खासदार अॅड. वंदना चव्हाण, आमदार सुनिल टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ, ज्येष्ठ नगरसेवक दिपक मानकर, सुभाष जगताप, दतात्रय धनकवडे ,बाबुराव चांदेरे, विशाल तांबे, दिलीप बराटे, सचिन दोडके आदी उपस्थित होते. या बैठकीच्या सुरवातीला प्रशासनाच्या प्रस्तावाची माहिती देण्यासाठी पालिकेचे अधिकारी राजेद्र मुठे यांनाही बोलविण्यात आले होते. त्यांनी या प्रस्तावा बाबत सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर सुभाष जगताप यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देणे चुकीचे आहे. पुणेकर आपल्यावर टिकेची झोड उठवतील. प्रस्ताव कसा फसवा आहे हे पटवुन दिले. या प्रस्तावात अॅमिनेटी स्पेस संबंधित भाडेकरुने घेतल्यानंतर त्याला ती जागा १९ बाबीसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे त्या जागेचा वापर हा संबंधित भाडेकरुच ठरविणार आहे. त्यावर शहरी वने कसे करणार असा सवाल सुभाष जगताप यांनी केला. त्यावरुन वंदना चव्हाण आणि जगताप यांच्यात वादावादी झाली.
पालिका इमारत भाडयाने देण्याची जाहीरात देतील
महापालिकेची इमारत भाडयाने देण्याची जाहीरातही भाजपवाले देउ शकतात. पुणेकरांनी आपल्याला जागा भाडयाने देण्यासाठी नाही तर विकास कामे करण्यासाठी पाठिवले आहे. त्यामुळे या प्रस्तावाला ठाम विरोध राहणार आहे, असे नगरसेवक दिपक मानकर यांनी सांगितले. त्यावर सर्वच पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला विरोध करायचे एकमताने ठरले.
तर प्रस्ताव विखंडित करण्यासाठी राज्यसरकारकडे जाणार शहरातील ‘अॅमेनिटी स्पेस’च्या जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर मंजुर केला. तर ४९१ खाली हा प्रस्ताव विंखडित करण्यासाठी राज्यसरकारकडे जाण्यात येणार आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा