पुणे, २२ डिसेंबर २०२२: पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेचे कारण देत काढून टाकणाऱ्या व ठेकेदारांच्या हितासाठी काम करणार्या प्रशासनाच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेवर भव्य मोर्चा काढला.
पुणे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कंत्राटी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना ४५ वर्ष वय झाल्याचे कारण देत कामावरून कमी करणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
केंद्र शासनाने निवृत्तीचे वय ६० व ५८ वर्ष निश्चित केलेले असताना पुणे महानगरपालिका प्रशासन केवळ ठेकेदारांच्या हितासाठी मनमानी पद्धतीने कारभार करत आहे. ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना अचानकपणे या वयात कामावरून काढून टाकत त्यांच्यावर उपासमारीचे संकट पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनामुळे येणार आहे. राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात रोजगार तर मिळाले नाहीत परंतु आहेत ते रोजगार कसे जातील याकडे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका प्रशासनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे. तसेच येत्या काही दिवसात स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील अशाच प्रकारे कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांमुळे या शहराची संपूर्ण घडी व्यवस्थितपणे चालते त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत बेरोजगार करण्याचे पाप पुणे महानगरपालिका प्रशासन करत आहे या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दांमध्ये निषेध करते तसेच सदर कर्मचाऱ्यांना तात्काळ पुन्हा कामावर हजर करून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन या मोर्चाच्या वेळी यांनी पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना देण्यात आले.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नंदा लोणकर, प्रदीप देशमुख,प्रदीप गायकवाड ,अशोक कांबळे,वनराज आंदेकर,नितीन कदम,मृणालिनी वाणी,किशोर कांबळे आदी उपस्थित होते.
More Stories
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत जर्मनीच्या तात्जाना मारिया हिला विजेतेपद
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश