पुणे: ऑनलाईनरित्या कर्ज मंजूर करीत दुकानदाराला घातला गंडा, चंदननगर पोलिसांकडून आरोपीला बेड्या

पुणे, दि. २३/११/२०२२ – पेटीएम कंपनीचा प्रतिनीधी असल्याचे भासवुन दुकानदाराला कर्ज मंजूर करीत रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेत फसवणूक करणाऱ्याला चंदननगर पोलिसांनी ओरिसातून अटक केली. अजित कुमार अक्षयकुमार पटनाईक, सध्या रा. चंदननगर, पुणे मुळ रा. स्क्वेअर कटक ओरीसा असे अटक केलेल्याचे नाव आहे.

आरोपीने चंदननगर परिसरातील दुकानदारला पेटीएम कंपनीचा प्रतिधिनी असल्याची बतावणी केली. त्यांना मोबाईलवरुन १० मिनीटांत लोन मंजुर करीत ३५ हजारांची रक्कम स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करून घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचे तांत्रिक विश्लेषण मिळविले. तो चंदननगरमध्ये फिरत असल्याचे लक्षात येताच, सापळा रचून अजितकुमारला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

“पेटीएमद्वारे कर्ज मिळवून आरोपीने काहीजणांना विश्वासात घेउन अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या दुकानदारांनी चंदननगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा”, राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर ठाणे

ही कामगिरी उपायुक्त शशिकांत बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, सुरज जाधव, अजय शेळके, मनोज भंडारी यांनी केली.