पुणे: भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी तरूण ठार

पुणे, ३०/०८/२०२१: भरधाव मोटारचालकाने दिलेल्या धडकेत पादचारी तरूण ठार झाला. हा अपघात २९ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास वारजेत घडला. प्रकाश ज्ञानोबा शेळके (वय ३९, रा. रामनगर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार एस. एस. पाठक यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दोन दिवसांपुर्वी रात्री आठच्या सुमारास प्रकाश शेळके मुंबई-बंगलोर महामार्गानजीक रस्त्यावरून पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मोटारचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे प्रकाश गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारचालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.