पुणे, २६/७/२०२१ – मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तरूणाच्या हातातील ६० हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना २५ जुलैला संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास खराडीतील गंगा कॉन्स्टेला इमारतीसमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी गोवर्धन मानम (वय २६, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर्धन एका खासगी वंâपनीत कामाला असून काल संध्याकाळी सातच्या सुमारास ते मोबालवर बोलत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी जबरदस्तीने त्यांच्या हातातील ६० हजारांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. गोवर्धन यांनी आरडाओरडा करेपर्यत चोरटे पसार झाले. याप्रकरणी चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.
More Stories
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत 100 हुन अधिक खेळाडू सहभागी
क्रीडा प्रबोधिनीच्या मोठ्या विजयात युगची हॅटट्रिक
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ओमर सुमर व सेजल भुतडा यांना विजेतेपद