पुणे: ११७ कर्मचाऱ्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केली हकालपट्टी

पिंपरीचिंचवड, ९ आॅगस्ट २०२२ : १९८६ रोजी स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून मागच्या २६ वर्षांमध्ये ४५७ अधिकारी सेवानिवृत्त झाले असून ८४६ कर्मचाऱ्यांची निधन झाले आहे. त्याचप्रमाणे १०६ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असून एक हजार तीनशे चार जणांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. आणि ११७ कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेने निलंबित केले आहे. या वेगवेगळ्या कारणांमुळे महानगरपालिकेतून ५०३६ अधिकाऱ्यांची सेवा संपलेली आहे. महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या घटलेली असून कंत्राटी काम करणाऱ्यां- कडून महानगरपालिकेची काम केली जात आहेत.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १९९२ साली वाढत्या लोकसंख्येमुळे , वाढत्या क्षेत्रफळामुळे , वाढत्या दुकानांच्या , दवाखान्यांच्या , कारखान्यांच्या , संख्येमुळे आणि या सगळ्यांमुळे घडणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे नोकर भरतीची प्रक्रिया पार पडली होती . परंतु त्यानंतर अजूनही महानगरपालिकेमध्ये नोकर भरती झाली नसल्याने , महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे . त्यामुळे लवकरात लवकर भरती होणं महत्त्वाचं आहे. महिन्याअखेरीस पालिकेतून ५० – १०० अधिकारी निवृत्त होत आहेत किंवा स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत. अनेकवर्ष नोकरभरती नसल्याने‌ नागरी सेवांचं काम करतानाही पालिकेवर ताण निर्माण होत आहे . त्यामुळे महानगरपालिकेचा ब वर्गात समावेश केला असल्याने पालिकेने कामांचा नवीन आराखडा तयार केला आहे. अनेक नवीन पदे निर्माण केली आहेत.

एप्रिल महिन्यात सर्व महानगरपालिकांना कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सांगितले आहे. त्यानुसार , ४२९२जागांची भरती करण्यासाठी त्यातील वैद्यकीय विभागाच्या १२८ जागांसाठी पहिल्या टप्यात परीक्षा घेण्यात आली होती. पण ही भरती प्रक्रिया उच्च न्यायालयाने थांबविली आहे.