पुणे: वाकड मधील भाईचे केल टक्कल अन काढली धिंड, पोलिसांची कारवाई

पुणे, ३०/०१/२०२२: गल्लीबोळातील तरुणांना दादागिरी करून भाई बनण्याची चांगलीच हौस आहे. मात्र वाकड पोलिसांनी अशा स्वयंघोषित भाईंना पकडून त्यांचे टक्कल केले आणि त्यांची धिंड काढून मस्ती जिरवली. पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाला तो भाई म्हणाला नाही म्हणून जमिनीवरील बिस्किटं खायला लावून बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळे वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या होत्या. पैकी तीन जण अल्पवयीन आहेत. दरम्यान, मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा फरार आहे.

या प्रकरणातील प्रकाश इंगोले, प्रशांत आठवले, अजित उर्फ आदित्य काटे अशी धिंड काढलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटने प्रकरणी मारहाण झालेल्या तरुणाने तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी थेरगाव येथे आरोपी रोहनने एका तरुणाला “ तू मला भाई का म्हणला नाहीस. मी या परिसरातील भाई आहे.” असे म्हणून जमिनीवरील बिस्किटं खायला लावून त्याला बेल्टने इतर मित्रांच्या मदतीने मारहाण केली होती. यात, तरुणाच्या पाठीवर मारहाणीचे व्रण देखील उमटले होते. त्यानंतर तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, वाकड पोलिसांनी सात पैकी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर, या तीन आरोपींच मुंडण करून त्यांनी गुन्हा केलेल्या परिसरात त्यांची आज धिंड काढली.

अशा प्रकारचा गुन्हा केल्यास गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल असे म्हणत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सज्जड दम दिला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी केली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर
पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलिस उपायुक्त (परिमंडळ २) आनंद भोईटे, सहा.पोलीस आयुक्‍त (वाकड विभाग) श्रीकांत दिसले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे-०२) रामचंद्र घाडगे, सपोनि अभिजीत जाधव, पोलीस उप निरीक्षक गणेश तोरगल, पोलीस उप निरीक्षक संगिता गोडे, पोलीस
अंमलदार राजेंद्र काळे, बाबाजान इनामदार, वंदु गिरे, प्रमोद कदम, कल्पेश पाटील, अतीक शेख, देवा वाघमारे, अतिश जाधव, दिपक साबळे यांनी मिळुन केली आहे.