ठाण्याला हरवून पुणे उपांत्य फेरीत

पुणे १६ मे २०२२ – मुलींच्या १७ वर्षांखालील जिल्हा अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत ठाण्याचे कडवे आव्हान एकमात्र गोलच्या जोरावर परतवून लावत पुणे संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

 

नाशिक येथील स्व. मीनाताई ठाकरे मैदानावर सोमवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पुण्याचा एकमेव विजयी गोल पूर्वार्धाच्या अगदी सुरवातीलाच दहाव्या मिनिटाला कर्णधार पूर्वा गायकवाड हिने केला. पुझे जाऊन पू्र्णवेळ दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला. कुणीच कमी पडले नाही. पुण्याने सुरवातीलाच आघाडी घेतली हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरले.

 

उपांत्य फेरीत आता पुण्याची गाठ नाशिकशी पडेल. अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नाशिकने एकमात्रच गोलच्या जोरावर बुलढाणा संघाचा १-० असा पराभव केला. पहिल्या सामन्यात पुण्याने हिंगोलीवर ८-० अशी दणदणीत मात केली होती. हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरले.