पुणे : आता थेट सोसायट्यांमध्येच लसीकरण : मुरलीधर मोहोळ

पुणे, २०/१०/२०२१: ‘पुणे महानगरपालिका हद्दीत लसीकरण वेगाने तर होत आहेच मात्र राहिलेल्या नागरिकांनाही लवकर लस देणे आवश्यक असून त्यासाठी थेट सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरणाची विशेष मोहिम पुणे महानगरपालिका राबवत आहोत. या मोहिमेंतर्गत थेट सोसायट्यांमध्येच महापालिकेची लसीकरण टीम बोलवता येणार आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

लसीकरणाच्या या विशेष मोहिमेंतर्गत क्षेत्रिय कार्यालयनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नंबर प्रसिद्ध करण्यात आले असून आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर थेट टीम सोसायटीमध्ये दाखल होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘ज्या गृहसंस्था, सोसायटीमधील नागरिकांचे लसीकरण राहिलेले आहे, अशा सोसायट्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अपेक्षित लाभार्थी संख्या कळवावी’

पुणे मनपा हद्दीत विक्रमी लसीकरण झालेले असून असे असले तरी या लसीकरणाला आणखी वेग देण्याचा प्रयत्न आहे. आजवर लसीकरणाबाबतीत महापालिकेने राबवलेल्या सर्वच विशेष मोहीमा यशस्वी झालेल्या आहेत. या मोहिमेलाही पुणेकर प्रतिसाद देतील, हा विश्वास वाटतो’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

क्षेत्रिय कार्यालयनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी

१. येरवडा-कळस-धानोरी
डॉ .माया लोहार
९६८९९३१९६६

२. ढोले पाटील रोड
डॉ. सुजाता माने
९०११०४९०१०

३. नगररोड-वडगावशेरी
डॉ. विजय बडे
९८८१३९८०४८

४ शिवाजीनगर-घोलेरोड
डॉ. मृणाल कोलते
९३२६०५०३४४

५ औंध-बाणेर
डॉ. गणेश दामले
७५८८१७०९९८

६ कोथरूड-बावधन
डॉ. टिळेकर अंजली
७३५००२००१०

७ वारजे-कर्वेनगर
डॉ. अरुणा तरडे
९८२३५१४६४४

८ सिंहगड रोड
डॉ. काकडे आसाराम
९७६२५०५४००

९ धनकवडी-सहकारनगर
डॉ. संदीप परदेशी
९४२३९११५६२

१० वानवडी-रामटेकडी
डॉ. मनीषा सुलाखे ९७६४५६९४४७

११ हडपसर-मुंढवा
डॉ. स्नेहल काळे
९९७०९४२८७८

१२ कोंढवा-येवलेवाडी
डॉ. मदन बिरादार
९६८९९३१७२४

१३ भवानी
डॉ. सारंग केळकर ९८९०६०९४३२

१४ बिबवेवाडी
डॉ अमित उदावत ९४०५६९९५६०

१५ कसबा विश्रामबागवाडा
डॉ. गोपाल उज्ज्वनकर ८४२१९४८४९५