ॲमिनीटी स्पेसच्या भाड्यातून ४०० कोटीचे उत्पन्‍न धोरण शहर सुधारणा समितीपुढे मान्यतेसाठी


पुणे, १९ / ७/ २०२१: शहरात मोक्याच्या ठिकाणी पडून असलेल्या ॲमिनीटी स्पेसच्या जागा ३० वर्ष भाड्याने देऊन त्यातून पैसे मिळविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाचा आहे. १४७ ॲमिनीटी स्पेस दिर्घमुदतीने भाड्याने गेल्यास किमान ४०० कोटीचे उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मिळकतकर, बांधकाम विभाग यासह इतर काही विभागांवर जास्त भर असतो. पण पारंपरीक पद्धतीने याच विभागातून जास्त पैसे मिळवताना ताण येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासाकडून इतर मार्गांनी पैसे मिळावेत यासाठी खटाटोप सुरू आहे. विकास आराखड्यातील आरक्षणे किंवा बिल्डरकडून विकसीत होऊन मिळणाऱ्या इमारती यासह गार्डन, रुग्णालय, खेळाचे मैदाने, शाळा, पोलिस ठाणे, अग्नीशामक केंद्र अशा जागा ॲमिनिटी स्पेस म्हणून महापालिकेला मिळातात. या जागा मिळाल्यातरी महापालिकेकडे असलेला यंत्रणेचा व मनुष्यबळाचा अभाव त्यामुळे त्यांचा वापर करता येत नाही. त्याचा नागरिकांना व महापालिकेला उपयोग होत नाही.
या ॲमिनिटी स्पेस विकण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी तयार करण्यात आला होता, पण त्यास कडाडून विरोध झाल्यानंतर आता या जागा भाड्याने देण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे.
शहरात महापालिकेच्या ७३२ ॲमिनीटी स्पेस असून, १४८.३७ हेक्टर इतके त्यांचे क्षेत्र आहे. त्यापैकी ५८५ ॲमिनीटी स्पेस तरतूदीनुसार विकसती झालेल्या आहेत. तर काही होत आहेत. १४७ ॲमिनीटी स्पेस या आरक्षण विरहित आहेत. त्या भाडे काराराने देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीपुढे सादर केला आहे.

या प्रस्तावात


निविदा प्रक्रिया राबवून ॲमिनीटी स्पेस भाड्याने देणार, ३० वर्षाचा करार करताना रेडिरेकनरनुसार एकरकमी भाडे घेणे, शासनाच्या मान्यतेनंतर ९० वर्ष मुदतीने जागा भाड्याने देता येणार, समाविष्ट गावांमधील ॲमिनीटी स्पेस पीएमआरडीएकडून मिळाल्यानंतर त्यांचे स्वतंत्र धोरण, ॲमिनीटी स्पेसवर पोटभाडेकरून ठेवायचा असेल तर आयुक्तांची मान्यता घ्यावी लागणार, त्यासाठी शिघ्रसिद्धगणकानुसार मूल्यांकन रकमेच्या १० टक्के रक्कम भारवी लागणार अशा तरतूदी केलेल्या आहेत.