पुणे: गणेशोत्सवासंदर्भात उद्या बैठक

पुणे, १०/०८/२०२१: महापालिकेतर्फे आगामी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेश मंडळ, पोलिस अधिकारी, नगरसेवक यांची बैठक गुरुवारी (ता. १२) दुपारी ३ वाजता महापालिकेच्या जुन्या सभागृहात आयोजित केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीस गणेश मंडळाच्या एकाच सदस्याने उपस्थित राहावे असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

यंदा १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव होणार आहे. कोरोनाची साथ कमी झालेली असली तरी धोका टळलेला नाही. महापालिकेने यापूर्वीच परिपत्रक काढून गणेशोत्सव साधेपणाने करावा, मिरवणुका काढता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. गतवर्षी गणेश मंडळांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करत गर्दी न करता उत्सव साजरा केला.

त्याचप्रमाणे यंदाही साजरा केला जावे यासाठी प्रयत्न आहे. यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. कार्यकर्त्यांना या बैठकीत आॅनलाइन देखील सहभागी होता येईल. यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे