महापालिकेत समाविष्ट २३ गावांच्या विकास आराखडयावर मागवल्या हरकती सूचना

पुणे, दि . २ ( प्रतिनिधी ) : महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांसह पीएमआरडीए हद्दीचा विकास आराखडा जाहीर केला आहे. या आराखडयावर येत्या ३० दिवसांत हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत.


r मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत पीएमारडीएच्या प्रारूप आराखडयाला मंजुरी देण्यात आली. त्यावर पुढील ३० दिवसात नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन येत्या काही महिन्यात विकास आराखडा मंजूर केला जाणार आहे. नागरिकांना पीएमारडीए च्या औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन येथील कलादालन येथे तसेच पीएमआरडीए च्या वेबसाईटवर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आला आहे.


नागरिकांनी त्यांच्या हरकती व सूचना आजपासून ३० दिवसांच्या आतमध्ये पीएमारडीए च्या औंध येथील कार्यालयात महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे लिखित स्वरूपात द्याव्यात. मुदतीत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांच विचारात घेतल्या जातील असे महानगर आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.