मोक्कातील फरार देवेंद्र जैन याला पोलीसांकडून अटक

पुणे, १३/०७/२०२१:  फसवणूक आणि खंडणीप्रकरणी मोक्का गुन्ह्यात मागील काही महिन्यांपासून फरार असलेल्या कथित पत्रकार देवेंद्र जैन यालाही पोलिसांनी अटक केली. आर्थिक फसवणुक, धमकी, खंडणी असे ८ वेगवेगळे गुन्हे दाखल असलेला व मोक्का गुन्हयातील फरार  जैन याला पुणे पोलीसांचे गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. माहिती अधिकार कार्यकर्ता   रवींद्र बऱ्हाटे यास पोलीसांनी  अटक केल्यानंतर त्याच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत.

 

आरोपी देवेंद्र जैन शहरातील काही दैनिकात काम करत होता.  दरम्यान नागरिकांची फसवणूक करणे, लुटमार, खंडणीप्रकरणी त्याच्यासह रविंद्र बऱ्हाटे, बडर्तफ पोलीस शैलेश जगताप, परवेझ जमादार, सांगलीचे पत्रकार संजय भोकरे यांच्यासह साथीदारांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर मागील सात महिन्यांपासून  जैन पसार झाला होता. त्याचेवर मोक्काची कारवाई पोलीसांनी करुन त्यास फरार  घोषित केले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बऱ्हाटे व जैन यांना अटक करण्यासाठी  विशेष पथकाची नेमणूक केली होती.

 

पथकाने राज्यातील विविध भागात छापेमारी करुन त्यांचा शोध घेतला होता.  फरार काळात जैन कुठे राहत होता, कोणाचे संर्पकात होता, त्यास मदत कोणी केली, त्याचे अन्य साथीदार कोण आहे याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहे.