पुणे, ०३ जुलै २०२१: फसवणूक आणि जमीन बळकावून फरार असलेला आरोपी रविंद्र बऱ्हाटे याला मदत करणे वकिलाला भोवले आहे. याप्रकरणी ऍड. सुनील मोरे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी फसवणूक कटात मदत केल्याचा ठपका ठेऊन बऱ्हाटेच्या पत्नी व मुलासह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संगीता रविंद्र बऱ्हाटे (वय ५५ ), मुलगा मयूर बऱ्हाटे आणि पितांबर गुलाब धिवार अशी आतापर्यंत अटक केलेल्यांची नावे आहे.
शहरातील विविध नागरिकांकडे खंडणी मागणे, फसवणूक आणि जमिन बळकाविण्याच्या १२ गुन्हयांमध्ये बऱ्हाटे फरार आहे. त्याच्यासह तथाकथीत पत्रकार देवेद्र जैनही फरार आहे. त्यापैकी तीन गुन्ह्यामध्ये बऱ्हाटेविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या टोळमध्ये सांगलीचे संजय भोकरे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांचाही समावेश आहे. मागील वर्षभरापासून बऱ्हाटे पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याने फेसबुकवर दोन वेळा प्रसारित करुन पोलिसांवर आरोपी केले होते. संंबंधित व्हिडिओ व्हायरल करण्यास मदत करणाऱ्या पितांबरलाही पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात पत्नीसह मुलगा याचाही कटामध्ये सहभाग असल्याचे दिसत होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी सुमारास संगीता बऱ्हाटेला अटक केले होते. त्यानंतर मुलगा मयूर यालाही अटक करण्यात आली होती. याप्रकरणी प्राथमिक चौकशीत ऍड सुनील मोरे यांनीही फरार बऱ्हाटेला मदत केल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी सचिन गुलाब धिवार याचा भाऊ पितांबराला पोलिसांनी अटक केली आहे. बऱ्हाटे फरार झाल्यापासून पितांबर त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत केले होते. सर्व व्हिडीओ व ऑडीओ तयार करून प्रसारीत करण्याच्या कामात पितांबर याने बऱ्हाटेला मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानुसार त्याला अटक केली आहे.
More Stories
ठाण्याला हरवून पुणे उपांत्य फेरीत
अस्मयच्या हॅटट्रिकने लौकिक एफएचा विजय पीडीएफए फुटबॉल
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सार्थ बनसोडेचा मानांकित खेळाडूवर विजय