पुणे: स्वराज्य शिलेदार माथाडी संघटनेच्या नावाखाली मागितली खंडणी, एकाला अटक

पुणे, २७/०७/२०२२: – कंपनी मालकाने घेतलेल्या लेबर  कांत्राटाचा बदल्यात महिन्याला ४० हजार रूपयांची खंडणी मागत ३० हजारांची वसुली करणाऱ्या एकाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याने स्वराज्य शिलेदार माथाडी संघटनेच्या अध्यक्ष असल्याचे सांगत खंडणी वसूल केली आहे.
ओंकार रमेश हिंगे (वय २३, रा. बिबवेवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.  प्रकाश  इजगज (वय २८, रा. धायरी )  यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

प्रकाश हे लेबर कंत्राटदार असून आरोपी ओंकारने त्यांना २६ जुलैला फोन केला. मी स्वराज्य शिलेदार माथाडी संघटनेच्या अध्यक्ष आहे. जर कंपनीत माझे माथाडी कामगार लावले नाही तर महिन्याला ४० हजार रूपये द्यावे लागतील. नाहीतर तू या कंपनीमध्ये काम कसे करतो, अशी धमकी दिली. प्रकाशने तडजोडीअंती ३० हजार रूपये  देण्याचे मान्य करीत पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून आरोपी ओंकारला रंगेहात पकडले.  सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे तपास करीत आहेत.