पुणे: इंधन चोरीमधील सुत्रधाराला पोलिसांकडून जेरबंद

पुणे, १३/१०/२०२२: इंधन चोरी प्रकरणी फरार असलेल्या सुत्रधाराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. पाच दिवसापुर्वी कदमवाकस्ती हद्दीत इंधन चोरीच्या अड्ड्यावर छापा टाकुन, दोन टँकरसह ८० लाखांचा ऐवज जप्त केला होता. यावेळी सात जणांना अटक केली होती. पोलीसांनी याप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला जेरबंद केल्याने इंधनमाफियांचे धाबे दणाणले आहे.

इंधनचोरी टोळीचा सूत्रधार प्रविण सुद्राम मडीखांबे (रा. संभाजी नगर, कदमवाकवस्ती,पुणे) याला अटक केली आहे. तर यापूर्वी केलेल्या कारवाईत धिरज विठ्ठल काळभोर (वय ३६, रा. कदमवाकवस्ती ता हवेली,पुणे), अमिर मलिक शेख (वय ३२, रा. कदमवाकवस्ती, मुळ गाव मु. पो पिंपळे (आर) ता. बार्शी जि सोलापुर), सचिन भाऊराव सुरवसे (वय ३०, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर. मुळ रा. भाळवणी, जेऊर, ता करमाळा), विजय मारुती जगताप (वय ५२, अंबरनाथ मंदीराजवळ, लोणी काळभोर.), रामचंद्र रावसाहेब देवकाते (वय ४१, रा. संभाजी नगर, कदमवाकवस्ती), धिरज विठ्ठल काळभोर (वय ३६, रा. कदमवाकवस्ती), इसाक इस्माइल मजकुरी (वय ४२, रा. संभाजी नगर ताराहाइट्स बी ४०४, कदमवाकवस्ती) यांना अटक केली आहे.इंधन चोरीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल महेश बबन काळभोर (वय ४२, रा. कदमवाकवस्ती) यांना पोलीसांनी अटक केली होती. त्यावेळी दोन टॅकरसह त्यामधून काढलेले इंधन असा एकूण ८० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.