पुणे, ०९/०७/२०२१: मोठ्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमिषाने तरूणांना आर्थिक गंडा घालून धुमाकूळ घालणाऱ्या दिल्लीतील कॉल सेंटर उध्दवस्त करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. टोळीने अनेकांना फसविले असल्याचे उघडकीस आले आहे. रिषभ अनिल दुबे, विपीन अशोककुमार यादव, रिषभ मनिष दुभे आणि पियुषकुमार सतीश यादव (रा. जेजे कॉलनी, रामफल चौक, दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील एका उच्च शिक्षित महिलेने नोकरीसाठी एका जॉब पोर्टलवर सर्व माहिती भरलेली होती. त्यानुसार आरोपींनी मार्च २०२१ मध्ये बनावट ईमेल आयडीवरन महिलेशी संपर्क केला. पुणे व मुंबई येथील मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पगाराचे आमिष दाखविले. विविध कारणे सांगून महिलेकडून ९ लाख २५ हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली होती. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके यांच्या पथकाने तांत्रिक गोष्टींच्या आधारे आरोपीचा माग काढला. त्यावेळी ते नवी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी आरोपींनी कॉल सेंटरच सुरू केल्याचे तपासात उघडकीस आले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेदगुडे, अस्लम आत्तार, संदेश कर्णे, मंगेश नेवसे, योगेश वाव्हळ, नितेश शेलार, नीलम साबळे, अंकिता राघी, माधुरी डोके यांनी केली.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार