मोटारीची चोरी करून मोबाईल शॉपीवर टाकला दरोडा, टोळीला खंडणी विरोधी पथकाकडून बेड्या

पुणे, १२/०७/२०२१:  मोटारीची चोरी करून मोबाईल शॉपीत दरोडा टावूâन लुट करणाNया टोळीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून  ५ मोबाईल , तीन हेडफोन, चार्जिंग केबल,  ब्लूटूथ स्पीकर, वायरलेस हेडफोन मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला. डेव्हिड समुयल खंडागळे (वय १९, रा. बोपोडी), आतीक अब्दुल आलीम शेख (वय  २० रा. खडकी बाजार),  रवी रामचंद्र कोळी (वय १९ रा, बोपोडी) ओमकार सुधाकर परमवार (वय २२, रा. जुना बाजार खडकी)  ऋषिकेश राकेश तांबे (वय १९ रा. पिपंळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आरोपी डेव्हिड आणि आतिक खडकी बाजार बस स्टँड परिसरात  मोबाईल  विक्री करण्यासाठी येणार  असल्याची माहिती  विनोद साळुंके आणि सुरेंद्र जगदाळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदारांसोबत औंधमधील मोबाईल शॉपी फोडून  मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यासाठी त्यांनी खडकी येथून मोटारीची चोरी केली.

त्यातून प्रवास करीत मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण ,  विनोद साळुंके, शैलेश सुर्वे ,  सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, सचिन अहीवळे, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने यांनी केली.