पुणे: आंतरराज्यीय सराईत टोळीकडून घरफोडीचे गुन्हे उघड, गुन्हे शाखेच्या युनीट चार कडून टोळीला अटक

पुणे,  ०२/०९/२०२१: राज्यभरातील विविध शहरांमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केले. त्यांच्याकडून  सोन्या-चांदीचे दागिणे, ९ मोबाईल, १० हजारांची रोकड असा मिळून १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  साकिब शौकतअली अन्सारी वय २३,  दानिश वारीस शेख वय २२, सलमान ऐहसान अलवी वय २६,  वसिम शौकतअली अन्सारी वय २४ सर्व रा. उत्तरप्रदेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरात घडत असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीसूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेकडून हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी सेनापती बापट रस्त्यावर रिक्षा उभी असून त्यामध्ये बसलेल्यांकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार एपीआय शोभा क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक जयदिप पाटील,  महेंद्र पवार,  राजस शेख,  दत्ता फुलसुंदर,  प्रविण भालचिम,   राकेश खुनवे,  अशोक शेलार,  सागर वाघमारे, शितल शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी  पाषाण व बाणेर येथे दोन घरफोडी केल्याची कबुली दिली. सर्व आरोपी हे बिजनौर, उत्तरप्रदेश येथील रहाणारे असून पुणे शहरात तसेच पिंपरी चिंचवड, मुंबई व गुजरात येथे  त्यांनी गुन्हे केलेले आहेत.

ही कामगिरी सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे,  एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या पथकाने केली.