शहरातील १४०० बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्जवर पुणे पोलिसांकडून कारवाई 

मुबारक अन्सारी

पुणे, 25 जून 2022: पुणे शहर पोलिसांनी शहरातील 1400 बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्ज शोधून काढले असून, पुणे महानगरपालिकेतर्फे (पीएमसी) या होर्डिंग्ज विरोधात कारवाई सुरू केली आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अशा बेकायदेशीर होर्डिंग किंवा बॅनरवर कारवाई न झाल्यास नागरिकांनी 112 वर डायल करून पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.