पुणे, २३ ऑगस्ट २०२५ : जगप्रसिद्ध पुणेरी गणेशोत्सव यंदा आणखी उत्साहात साजरा होणार आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” दर्जा दिल्याने यंदा पाहुण्यांची संख्या वाढणार असून पोलिसांनीही तितक्याच काटेकोर नियोजनाची तयारी सुरू केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील मानाच्या गणपतीपासून विविध मंडळांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेतला.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात येत्या २७ ऑगस्टपासून होत आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक पुण्यातील गणपती दर्शनासाठी येतात. राज्य महोत्सवाच्या दर्जामुळे यंदा गर्दी अधिक मोठी असेल, त्यामुळे सुरक्षा, वाहतूक आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी पोलिसांनी विशेष योजना आखली आहे.
आयुक्तांची मंडळांना भेट व पाहणी :
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज वरिष्ठ अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांसोबत शहरातील प्रमुख गणपती मंडळांची पाहणी केली. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीपासून त्यांनी दौरा सुरू करून इतर मानाच्या मंडळांनाही भेट दिली. या वेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत सूचनाही दिल्या.
राज्य महोत्सवाच्या प्रतिष्ठेला साजेसे नियोजन :
आयुक्त कुमार म्हणाले, “गणेशोत्सव हा पुण्याचा अभिमान आहे. राज्य सरकारने दिलेल्या राज्य महोत्सव दर्ज्यानुसार सर्व व्यवस्था उंचावल्या जातील. नागरिकांच्या सुरक्षेला व सोयीसुविधांना प्राधान्य देत वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन सेवा, सीसीटीव्ही निरीक्षण, तातडीच्या प्रतिसाद पथके या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे.”
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर