September 23, 2025

पुणे: पोलीस अमंलदारांना धक्काबुक्की, टोळक्याला अटक

पुणे, दि. २४/०९/२०२३: भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अमलदारांना धक्काबुक्की केल्याची घटना २३ सप्टेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमारास गणेश पेठेत घडली. याप्रकरणी सहाजणांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

राकेश शंकर परदेशी वय २९, प्रताप अशोक परदेशी वय ३८, युवराज किशोर परदेशी वय २९, शंकर सुंदरलाल परदेशी वय ५२, सोमनाथ अशोक परदेशी सर्व रा. रविवार पेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अमलदार गंगाधर काळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अमलदार गंगाधर काळे आणि त्याचे सहकारी गणेश पेठ परिसरात थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या विशाल कोटकर याने आमची हातगाडी लावण्यावरून भांडण झाले आहेत, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे अमलदार काळे आणि त्यांचे साथीदार घटनास्थळी गेले. भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना टोळक्याने पोलीस अमलदारांना धमकी देउन धक्काबुक्की केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेंडगे तपास करीत आहेत.