पुणे, 27/01/2022: शहराच्या विविध भागातून वाहने चोरणाऱ्या सराईताला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून रिक्षा, केटीएम, अॅक्टीव्हा अशी २ लाखाची वाहने जप्त केली. विनायक कोळी( रा. लोहीयानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढते वाहन चोरीचे गुन्हयांना आळा
घालण्याचे दृष्टीकोनातुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथकाचे
अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या. खडक पोलीस स्टेशन हद्दीतील रेकार्डवरील गुन्हेगार चेक करीत
असतांना पोलीस अंमलदार रवी लोखंडे व संदिप तळेकर यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की, रेकॉर्डवरील विनायक कोळी याने सुमारे दोन ते अडीच महिन्यापुर्वी शिवाजी रस्त्यावरील बिकानेर स्वीट शेजारून रिक्षा चोरली असुन तो साठे उद्यान शुक्रवार पेठ पुणे येथे थांबलेला आहे, अशी माहिती मिळाली.
श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हर्षवर्धन गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने विनायक कोळी यास पकडले. त्याचेकडुन १ रिक्षा, १ केटीएम बाईक, १ अॅक्टीव्हा गाडया अशा एकुण ०३ वाहने
जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेली रिक्षा बाबत खडक पोलीस ठाणेस, केटीएम बाईक बाबत रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई व अॅक्टीव्हा मोपेड बाबत पिंपरी पोलीस ठाणेस गुन्हे दाखल असल्याचे तपास दरम्यान निष्पन्न झाले
असुन आरोपीकडुन दोन लाख पाच हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.कोळी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचा पुर्व इतिहास पाहता त्याचेवर यापुर्वी खडक, देहुरोड
पोलीस ठाणेस जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. राहुल खंडाळे, शंकर कुंभारे पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार अजीज बेग, संदिप पाटील, संदिप तळेकर, रवी लोखंडे, विशाल जाधव, राहुल मोरे, हिंमत होळकर, सागर घाडगे, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, किरण शितोळे, महेंद्र पवार यांचे ही पथकाने केली आहे.
More Stories
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत 100 हुन अधिक खेळाडू सहभागी
क्रीडा प्रबोधिनीच्या मोठ्या विजयात युगची हॅटट्रिक
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ओमर सुमर व सेजल भुतडा यांना विजेतेपद