पुणे: प्रशांत जगताप यांची सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाला भेट

पुणे, दि. 10 मे 2021: : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोमवारी (दि.10) पुणे कॅन्टोन्मेंमधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाला भेट दिली. यावेळी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जगताप यांच्याकडून रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जगताप यांनी लसीकरणाबाबत येणाऱ्या अडचणी व त्रुटी याबाबत नागरिक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कॅन्टोन्मेंट भागात लसीकरणाचा वेग कमी आहे. तो वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या बैठकीत प्रश्न मांडून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करू, तसेच यावेळी लसींचा कोटा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष आनंद सवाणे,कार्याध्यक्ष निलेश कणसे, दिनेश परदेशी, बबलू रॉयल, दिनेश अर्धाळकर, अरुण कांबळे, शाहरुख शेख व संघटक पुणे कँटोन्मेंट परवेज कुरेशी आदी उपस्थित होते.