पुणे: पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास पुणे महापालिका सज्ज

पुणे, ७ जून २०२१: पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पावसाळा कालावधीमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यावर साचणारे पाणी, वीजवाहिनी तारांवर झाड पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, यांसारख्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकारी, सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामाध्यमातून पावसाच्या प्रमाणाची नोंद घेणे, पावसाच्या पाण्याचा निचरा त्वरित होण्याच्या दृष्टीने उपाय योजना करणे, रस्त्यावरील खराब भाग दुरुस्त करणे व खड्डे बुजविणे इ. स्वरुपाच्या उपाय योजना तातडीने करण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका भवनातील पथ विभागाच्या खोली क्र.१२९ मध्ये एक जून पासून स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास ही सेवा उपलब्ध असेल नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्यांनी ०२० २५५०१०८ या दुरध्वनी क्रमांकावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात.