शिवाजीनगर, १४ जुलै २०२५: पुण्यातील नागरिकांसाठी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवरती असणारा सुप्रसिद्ध गुडलक कॅफे हा बंद ठेवण्यात येणार आहे.
एफडीए ने गुडलक कॅफेचा परवाना रद्द केल्याने त्रुटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र रेनोव्हेशन आणि इतर दुरुस्तीचं काम सुरु असल्याने कॅफे बंद केल्याचा दावा कॅफेकडून करण्यात येत आहे.
एफडीए च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खालील त्रुटी आढळल्या:
– कॅफेमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते.
– किचनमधील फरशी तुटलेली होती.
– काही ठिकाणी पाणी साचलेले होते.
– फ्रिजमध्ये अस्वच्छता होती.
– किचनमधील आणि बाहेरील कचरापेट्या उघड्या अवस्थेत आढळल्या.
या सर्व त्रुटींमुळे एफडीएने तात्पुरता परवाना रद्द करत कॅफे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

More Stories
निवडणुकीआधी भाजपचा मेगा स्ट्राईक! पुणे–पिंपरीत २२ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादी–उबाठा–काँग्रेसला मोठा धक्का
‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’ – मुरलीधर मोहोळ
पुणे ः अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त