पुणे: रामटेकडी परिसरात तरूणाला बेदम मारहाण , एकाला अटक

पुणे, 08 नोव्हेंबर 2022- चोरांची अफवा पसरवित आरडा-ओरड झाल्यामुळे पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाला अडवून मारहाण करीत १२ हजारांचा मोबाइल हिसकाविण्याची घटना ७ नोव्हेंबरला रात्री तीनच्या सुमारास रामटेकडी परिसरात वंदे मातरम चौकात घडली.

याप्रकरणी विनोद विलास कदम (वय ३२ रा. रामटेकडी, हडपसर) याला अटक केली आहे. हॅरी ब्रॅजिमेन बल्लार्ड (वय ३९) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बल्लार्ड कुटूंबियासह मगरीनबाई चाळीत राहायला आहेत. ७ नोव्हेंबरला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास परिसरात चोर-चोर असा मोठ्याने आवाज आला. त्यामुळे काहीतरी घटना झाली आहे असे समजून हॅरी घराबाहेर पडले. काही अंतरावर चोरट्यांनी त्याला गाठून बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील १२ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहायक पोलीस निरीक्षक राहूल गिरमकर यांच्या पथकाने केली.